लोणार तालुक्यातील भुमराळा येथील संतोष डिगांबर भोसले यांची शेती भुमराळा शिवार असुन गट नंबर 101 मध्ये 12 गुंठे क्षेत्रावर क्लस कंपनी चा मिरची चा प्लॉट नेटा मध्ये लागवड केला होता 8 सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात इसमाने मिरची प्लॉटमधील 650 झाडे विळ्याच्या साह्याने जमिनीपासून चार इंच वरुन संपूर्ण झाडे कापून टाकले असुन संतोष भोसले यांचे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.याप्रकरणी संतोष भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमाविरुद्ध बिबी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.