आज गुरुवार ११ सप्टेंबर रोजी सिटी चौक पोलिसांनी माहिती दिली की, 10 सप्टेंबरला सायंकाळी सात वाजता महिला फिर्यादी हमिदा इस्माईल शेख राहणार नेहरू भवन छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, 5 सप्टेंबरला दुपारी तीन वाजता शहागंज बाजारातून अज्ञात आरोपींनी त्यांच्या पर्समधून एक लाख 27 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी करून नेले आहे, या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहे.