धोकादायक इमारती हा वसई विरार परिसरातील मोठा प्रश्न आहे. धोकादायक इमारतींबाबत कडक कारवाई करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारची दयामाया यापुढे दाखवण्यात येणार नाही असे वसई विरार महानगरपालिका आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी विरार येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमी म्हणाले आहेत. दुर्घटनेतील जखमी आणि मृतकांना महानगरपालिका व सरकारमार्फत योग्य ती मदत करण्यात येईल असे देखील आयुक्त म्हणाले.