खामगाव शहरातील ९ नंबर शाळेजवळ घरी घरफोडी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखा पथक बुलढाणा च्या पथकाने खामगाव शहरातील आज दिनांक ३ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजे दरम्यान अटक केली आहे.नऊ नंबर शाळेजवळील रहिवासी शशांक देशपांडे यांच्या घरी चोरट्यांनी घरफोडी करून मुद्देमाल लंपास केला होता.या प्रकरणी शहर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून विविध कलमानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पथक बुलढाणा च्या पथकाने केला.