सेलू तालुक्यातील देऊळगाव गात येथील राधा कदम वय ३२ वर्षीय विवाहित महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार २७ ऑगस्ट रोजी सायंकाळी उघडकीस आली. घटनेची माहिती पोलीसांना कळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले प्रेत शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. शवविच्छेदन नंतर प्रेत नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करत आहेत