कळमनुरी तालुक्यात दिनांक 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी नदी नाल्यांना पूर येऊन शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे,या पार्श्वभूमीवर आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता सुमारास विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी तालुक्यातील गंगापूर वाकोडी शेत शिवारात येऊन तेथील पूरग्रस्त भाग व शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी केली आहे.यावेळी त्यांच्या समवेत संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्यासह उबाठा शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ते,तसेच शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती .