मुंबई गोवा महामार्गावर रानबांबुळी येथील वळणावर आज रविवार ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आराम बस आणि मोटरसायकल यांच्या त झालेल्या अपघातात वराड मालवण येथील मोटरसायकल चालक गणेश चंद्रकांत घोगळे वय २८ या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळतात सिंधुदुर्गनगरी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पुढील कारवाई करत होते.