जळगाव शहरातील मेहरूण भागात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. ममता हॉस्पिटलजवळ खेळत असलेल्या ६ वर्षीय मनीषा देवसिंग बारेला या चिमुकलीला भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात मनीषाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी, २६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.