मराठा समाजासाठी संघर्ष करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या पाच दिवसांच्या शांततामय उपोषणाला अखेर यश आले असून, राज्य सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.शासनाने यासंदर्भात अधिकृत शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.या ऐतिहासिक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा समाजात आनंदाचे वातावरण आहे.शिरोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिरोळ तालुका कल मराठा समाजाच्या वतीने आज मंगळवार दिनांक २ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता जल्लोष करण्यात आला.फटाके फोडून,पेढे व साखर वाटप केले.