खटाव आणि माण तालुक्यातील तीन तीर्थक्षेत्रांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रा स्थळ योजना ब वर्ग दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी याबाबतची माहिती मंगळवारी सकाळी दहा वाजता दिली. युवा नेते विक्रमशील कदम यांच्या वाढदिवसादिवशी दि. २७ जुलै रोजी मंत्री गोरे हे पुसेसावळी येथे अभिष्टचिंतन कार्यक्रमासाठी आले होते. या कार्यक्रमात त्यांना या विषयाची माहिती देण्यात आली होती.