सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. गवई यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असताना एका वकिलाने समोरील भागात येऊन भूषण गवई यांच्या दिशेनं पायातील बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे. गडकरी रंगायतन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया देत या प्रकरणाचा निषेध केला आहे.