गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील कोयर गावातील ६ वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पण मृत्यूनंतरही या बालकाला सन्मान मिळाला नाही, हे वास्तव संपूर्ण जिल्ह्याला चटका लावून गेले आहे.घटनेनंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह भामरागड येथे नेणे आवश्यक होते. मात्र गावापर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही. नाल्यावर पूल नसल्याने कुटुंबीयांनी खाटेची कावड करून तब्बल १ किलोमीटर नाल्यातून वाट काढत मृतदेह वाहून नेला.