दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथे चंद्रकांत लक्ष्मण बिराजदार ( वय १९, रा. संजवाड, मूळ गाव घुंगरेगाव, ता. अक्कलकोट) या तरुणाने अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. सदर घटनेची मंद्रूप पोलिसात झाली आहे. याबाबत मंद्रूप पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, चंद्रकांत बिराजदार याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे त्याची आई शांताबाई बिराजदार या माहेरी संजवाड येथे राहण्यास आल्या होत्या.