रत्नागिरी: जिल्ह्यात बालमृत्यू दर कमी करण्याच्या उद्देशाने "स्टॉप डायरिया" मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. तुषार कुंभार,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश्वरी सातव, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 16/06/2025 रोजी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र कोकणनगर, रत्नागिरी येथे संपन्न झाला. याप्रसंगी पी एच एन श्वेता तारये, प्रिया पेडणेकर, चेतन शेट्ये,तुषार साळवी, श्रीम. भाटकर,श्रीम. शितोळे तसेच नागरी प्रा.आरोग्य केंद्र कोकण नगरचे सर्व आरोग्य कर्मचारी,आशा, गटप्रवर्तक, लाभार्थी व नागरिक उपस्थित होते.