नांदुरा.तालुक्यातील वाडी येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची घटना १० मे रोजी रात्री १.३० वाजता दरम्यान घडली.या प्रकरणी तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी १० मे रोजी दुपारी १.१४ मिनिटांनी हरविल्याची नोंद केली आहे.तालुक्यातील वाडी येथील कु. प्रिती सिध्दार्थ धुरंदर ही तरुणी घरात कोणाला काही न सांगता घरातुन निघून गेली आहे. तिचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.यामुळे याबाबत आई सौ. सुनिता सिध्दार्थ धुरंदर यांनी नांदुरा पोलीस स्टेशनला तक्रार दिली.