परळी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शेतकरी संवाद यात्रा काढण्यात आली. राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकत्व असलेल्या नेतृत्वा कडुन मतदार संघात कुठेही ना शेतकरी, ना युवक, ना सर्वसामान्य जनतेच्या सर्वांगीन विकासात्मक पातळीवर विकास दिसून आला नाही. मला पाहा आणि फुले व्हा असणाऱ्या मंत्र्याला यावेळी परळी मतदार संघातील जनता पराभूत केल्या शिवाय राहणार नाही असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते श्री. सुनील भैया गुट्टे यांनी दिली.