जय हनुमान बाल तान्हा पोळा उत्सव समिती आणि हनुमान मंदिर वार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि 23 आगस्ट 5 वाजता आयोजित केलेल्या तान्हा पोळा उत्सव कार्यक्रमात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्य अतिथी म्हणून सहभाग घेतला. यावेळी त्यांनी पोळ्याच्या शुभेच्छा व्यक्त करून लहानग्या स्पर्धकांना बक्षिसे वितरीत केली.या कार्यक्रमातील बालकांनी सादर केलेल्या विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांनी सर्वांचे मनोरंजन केले.