शिरोळ तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली असून, अनेक गावांमधून नागरिक आणि जनावरांचे स्थलांतर सुरू आहे.मात्र,त्यांची सोय कुठे केली आहे याबाबत तालुका प्रशासनाने अद्याप स्पष्ट माहिती दिली नाही.त्यामुळे भीतीने ग्रासलेले लोक रस्त्यावर मिळेल त्या ठिकाणी थांबले असून,जनावरे देखील रस्त्याच्या कडेला बांधलेली आहेत.या संकटकाळात प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.