कत्तलीसाठी गायीची वाहतूक करणाऱ्या चौघांवर वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी ४ वाजता पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील लासूरगाव शिवारात ही कारवाई केली. सिद्धार्थ सुरेश देवकर, श्रीकांत कारभारी काळुंखे (दोघे रा. बाभुळगाव पिराचे), सोनू कुरेशी (रा. नायगाव, छत्रपती संभाजीनगर), मतीन अशी आरोपींची नावे आहेत.