शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती.यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी होवु घातलेल्या पोळा,गणेश उत्सव, ईद मिलाद व इतर सणांसाठी शांतता राखण्याचे आवाहन केले सोबत डीजे व लेझर लाईट वर कायदेशीर बंदी असल्याने तसे आढळून आल्यास संबंधित मालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. यावेळी या ठिकाणी विविध मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.