मौजे इरळद येथे पारधी वस्तीवर काल 21 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता बैलाची पूजा करत असताना गावातील काही जणांनी हल्ला करत महिला,मुली,पुरुषांना बेदम मारहाण करण्यात आल्याचे निवेदन पारधी समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देऊन , पारधी वस्तीवर हल्ला करणाऱ्यां विरोधात ॲट्रॉसिटी कायद्या नुसार कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितांनी आज शुक्रवार 22 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता केली.