गणेश उत्सव, ईद-ए-मिलाद व दुर्गा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिग्रस पोलिसांकडून आज सोमवार दि. १ सप्टेंबर सायंकाळी ५:३० वाजताच्या दरम्यान रूट मार्च काढण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर भोरे यांच्या उपस्थितीत हा रूट मार्च पोलिस स्टेशनहून सुरू होऊन शहरातील प्रमुख मार्गाने फिरून पोलीस ठाण्यात समाप्त झाला. या रूट मार्चमध्ये पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्यासह अधिकारी, पोलीस कर्मचारी, होमगार्ड व SRPF चे जवान सहभागी झाले होते.