बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी २० ऑगस्टला बोराखेडी आणि देऊळगाव माळी ता.मेहकर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह एकूण १४ जणांचे निलंबन केले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या निलंबनाला न्यायालयात आव्हान दिले होते. माननीय न्यायालयाने यासंदर्भात महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत निलंबनाच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.