रावेर तालुक्यात मुंजलवाडी हे गाव आहे. या गावात चुनाबर्डी शिवार आहे. या शिवारात मेंढपाळ दादा कोळपे वय २० हा तरुण होता दरम्यान वादळ वाऱ्यासह अचानक वीज कोसळली आणि त्यात तो ठार झाला तर त्याच्यासोबत असलेले चार जण हे जखमी झाले आहेत. तातडीने त्याला ग्रामीण रुग्णालय रावेर येथे नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्याला माहीत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.