लातूर: गणेश विसर्जनाच्या पाश्र्वभूमीवर लातूर शहर महानगरपालिकेकडून छत्रपती शिवाजी महाराज चौक हे राजीव गांधी चौकापर्यंतचे स्ट्रीट लाईटची आज दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून दुरुस्ती करण्यात येत आहे. मात्र राजीव गांधी चौकातील हायमॅक्स पोलवरील बंद असलेले दिवे दुरुस्त करण्यासाठी महापालिका यंत्रणेचे हात पोहचत नसल्याने ते बंदच आहेत. या चौकातील बंद असलेले हे दिवे देखील तात्काळ चालू करावेत, अशी मागणी लातूरकराकडून करण्यात येत आहे.