लातूर : माझ्या बापाच्या हिस्याच्या जागेत प्रकाशनगर लातूर येथे मी माझा पती संजय साडेतीन वर्षाच्या मुलासह राहतो. मात्र चुलता संतोष जाधव, आजी कमलबाई जाधव, भाऊ दत्ता जाधव, मेव्हणा श्रीकृष्णा काटे, महेश चव्हाण, अमृता चव्हाण, बहीण सीमा काटे हे सगळेजण मला सतत मानसिक व शारीरिक त्रास देत असून जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. माझे जगणे मुश्किल केले आहे. शिवाय माझ्या सासू सासऱ्यांना वानवाडा येथे जाऊन शिवीगाळ करणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार करत आहेत.