तावी येथे सुर कुटुंबियांना घरात अचानक भला मोठा साप दिसताच घरातील सदस्यांनो घर सोडून पळापळ होऊ लागले. दरम्यान सर्पमित्र खुशाल शेडके यांना घटनास्थळी पाचारण केले यावेळी सर्पमित्राने मोठ्या सिताफीने या भल्या मोठ्या अजगराला जेरबंद करताच दहशतीत असलेल्या रुषी सुर यांच्या कुटुंबियांची सुटका झाली हा अजगर ८ फूट लांबीचा असून ११ किलो वजनाचा आहे. या अजगराला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली यावेळी या अजगराला सर्पमित्र खुशाल शेडके यांनी सुखरूप जंगलात सोडून दिले.