गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, आलापल्ली, लगाम, ईल्लुर, ठाकरी, भेंडाळा, मार्कड्डा देव आमगाव, घोट, आरमोरी, वडसा आदी भागात शेतजमिनीची परस्पर खरेदी करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट झाला असून आम्हाला तुम्ही जमीन विक्री करा आम्ही तुम्हाला योग्य मोबदला व नोकरी मिळवून देवु असे खोटे आश्वासन देवुन फसवणुक करणारी टोळी सक्रिय झाली आहे. काही शेतकरी या आमिषाला बळी पडले आहेत.