३आक्टोबर २०२४ रोजी ग्रामरोजगार सेवकांना आठ हजार रुपये मानधन व दोन हजार रुपये डेटा पैक देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला मात्र याची अंमलबजावणी झाली नाही व तिन महिण्यांपासून त्यांच्या खात्यात पैसेही आले नसल्याने ग्रामरोजगार सेवकांवर ऊपासमारीची पाळी आली आहे. त्यामुळे सदर थकीत रक्कम मिळवून द्यावी यासाठी भद्रावती तालुका ग्रामरोजगार संघटनेतर्फे खा.प्रतिभा धानोरकर यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन सादर करण्यात आले आहे.