कोलगाव येथील सौ. अपर्णा बाबुराव जाधव (वय ४०) या विवाहितेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज गुरुवार २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.