दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुरु धानोरा येथे दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. तुकाराम भानुदास थोरात (वय ४५, रा.ता. वैजापूर) असे जखमीचे नाव आहे. त्यांना अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत इसारवाडी फाटा येथील रामानंदाचार्य नरेंद्राचार्य नाणिजधाम रुग्णवाहिकेतून चालक संदीप त्रिंबके यांनी उपचारार्थ शासकीय रुग्णालय घाटी दाखल केले.