परभणी शहर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात आज बुधवार 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी निमित्ताने दुपारी 2 वाजता वाजत गाजत श्री गणेश मुर्तीची मनोभावे स्थापना करण्यात आली. श्री गणेशाची स्थापना पुजा महानगरपालिका अधिकारी कर्मचारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष के.के. आंधळे, सफाई कामगार संघटनेचे अध्यक्ष के. के. भारसाकळे यांच्या हस्ते पार पडली. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कान्होबा तळेकर, सचिव राजेभाऊ मोरे, सहसचिव गजानन जाधव, कोषाध्यक्ष विशाल ऊफाडे आदींसह महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.