नांदेड शहरातील आनंदनगर ते व्हिआयपी रोडने घराकडे जातांना दि २४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १४:३५ ते १४:४५ दरम्यान यातील फिर्यादी महिला हि स्कुटी वरून घरी जात असताना वसंतनगर येथील मेडिकलच्या समोर पाठिमागुन एका मोटारसायकलवरून अनोळखी दोन इसम येऊन फिर्यादीच्या गळ्यातील एक तोळा सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून पळुन गेले. याप्रकरणी फिर्यादी जयश्री ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला असुन पुढील तपास सुरू आहे.