गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर परळी शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संभाजीनगर पोलीस पूर्ण शहरभर गस्त घालत होते. यावेळी पोलिसांना काही ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली. ही माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करत श्यामप्रसाद मुखर्जी उड्डाण पुलाजवळील वाल्मिकी नगर परिसरात छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी एका राहत्या घरातून तब्बल लाखो रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. या दारूचा साठा बॉक्स पॅक स्वरूपात लपवून ठेवण्यात आला होता.