लातूर -सततच्या पावसामुळे आणि पूरपरिस्थितीमुळे शिराळा-चिंचोली रस्त्यावरील पुल व त्यालगतचा रस्ता खचल्याने काही दिवसांपूर्वी वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. परिणामी शिराळा, चिंचोली, मुरुड आणि लातूरकडे जाण्या-येण्याचा संपर्क तुटला होता. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागत होते.या परिस्थितीत शिराळा येथील शालेय लातूर येथे लातूर ग्रामीणचे आमदार श्री. रमेशआप्पा कराड यांच्या भाजप संवाद कार्यालयात भेट घेऊन आपली व्यथा मांडली.