इस्लामिक कॅलेंडरनुसार रब्बी उल-अव्वलच्या १२ व्या तारखेला साजरा होणाऱ्या ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त रत्नागिरी शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. पैगंबर मोहम्मद साहेबांच्या जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवाने शहरात भव्य रॅली काढली. ज्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.