शहरासह बाळापूर येथील श्री गणेश उत्सव व तालुक्यात होणारा मिलाद उन नबी च्या सणाच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, शांततामय वातावरणात सर्व काही पार पडावे यासाठी धर्माबाद पोलिसांच्या वतीने आजरोजी संध्याकाळी 5 ते 6:30 ह्या वेळेत शहरातील मुख्य रस्त्याने व बाळापूर परिसरातील मुख्य रस्त्याने रूट मार्च करण्यात आले होते. यावेळी पोलीस निरीक्षक भडीकर सपोनि कराड सपोउपनि पवार मॅडम सपोउपनि लोणेकर, सपोउपनि मुत्तेपोड यांच्या सह पोलीस कर्मचारी व होमगार्ड प्रामुख्याने उपस्थित होते.