आज दिनांक 6 ऑगस्ट 2025 रोजी प्रधानमंत्री टी बी मुक्त भारत अभियान अंतर्गत श्री दत्त मंदिर माणगाव ट्रस्ट यांनी निक्षय मित्र माध्यमातून १९ क्षयरुग्ण दत्तक घेतले. सदर कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी मॅडम, मा.जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षल जाधव सर ,पंचायत समिती कुडाळ मा.गटविकास अधिकारी सर, प्रा.आ.केंद्र माणगाव चे आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका,तसेच DTO सिंधुदुर्ग चे कर्मचारी व लाभार्थी क्षयरुग्ण उपस्थित होते. मा.DHO मॅडम यांनी माणगाव देवस्थान ट्रस्ट यांचे आभार व्यक्त करून पुढील कालावधीत याच प्रकारे सहकार्य करावे अशी आशा व्यक्त केली.