सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणाचे 13 पैकी तेरा ही दरवाजे दिनांक 12 सप्टेंबरला रात्री नऊ वाजता उघडण्यात आलेअसून, चाळीस सेंटीमीटरने उघडण्यात आलेल्या या दरवाज्यातून 844 घनमीटर प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग वर्धा नदी पात्रात सोडण्यात आला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे जलाशयातील पाण्याची पातळी वाढल्याने धरण प्रचलन सूचनेनुसार तेरा ही दरवाजे उघडण्यात आले आहे