कर्जत येथे मुस्लिम समुदायासाठी उभारल्या जाणाऱ्या कथित धर्म आधारित टाउनशिप प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) गंभीर भूमिका घेत महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावली आहे. आयोगाने राज्य सरकारच्या मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत एक्शन टेकन रिपोर्ट (ATR) सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारीत या प्रकल्पाला ‘हलाल लाइफस्टाइल टाउनशिप’ म्हणून प्रचारित केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.