राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पदावर काम करीत असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समावेशन करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित झाला आहे.मात्र सव्वा वर्षाचा कालावधी लोटूनही अंमलबजावणी होत नसल्याने तसेच मानधनवाढ,बदली धोरण मान्य होत नसल्याने आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी संघटनेच्या शिष्टमंडळात समायोजन प्रक्रिया व विविध मागण्या बाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने बेमुदत आंदोलन सुरू आहे आज दि.28 ऑगस्ट रोजी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पुढे भर पावसात आंदोलन केले.