भाजप आमदाराचा प्रताप..भर चौकात चड्डी काढून मारण्याची अधिकाऱ्याला फोनवर धमकी.. ऑडिओ क्लिप व्हायरल. आज दिनांक 14 जुलै रोजी दुपारी पाचच्या दरम्यान नायगाव येथे भाजप आमदाराचा देखील कारनामा समोर आला आहे. व्हिडिओ व्हायरल एका कामासाठी भाजपचे आमदार राजेश पवार यांनी नरसी सोसायटीचे जिल्हा उपनिबंधक अशोक भिल्लारे यांना अश्लील शिवीगाळ करून आणि भर चौकात कुत्र्यासारखं मारण्याची धमकी दिली. धमकीचा ऑडिओ क्लिप समाज माध्यमावर व्हायरल झाला आहे. या ऑडिओ क्लिपमुळे नांदेड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.