चार दिवसापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह जाम नदीपात्रात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे मुसळधार पाऊस झाल्याने जाम नदीला चार दिवसापूर्वी पूर आला होता हा युवक पहाटे शौचास गेला असताना तो पाण्याचे प्रवाहात वाहून गेला पाचव्या दिवशी जाम नदीपात्रात दोन किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह बेशरम च्या झाडाला अडकल्याचे आढळून आले या घटनेची आष्टी पोलिसांनी नोंद घेतली असून तपास सुरू असल्याचे आज सांगितले