कळमनुरी तालुक्यातील बोथी येथील विजय विठ्ठलराव सावळे वय 43 वर्षे,हा मुंबई माणिकपूर वसई चिंतामणी चाळ या ठिकाणी वास्तव्य करून राहत होता,त्या ठिकाणी तो ऑटो चालवत असे,ऑटो चालत नसल्याने घर खर्च कसा भागवायचा या विवंचनेतून त्यांनी दि. 27 ऑगस्ट 30 ऑगस्ट दरम्यान कळमनुरी तालुक्यातील जांब शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे,याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलिसात आकस्मित मदतीची नोंद घेण्यात आल्याची माहिती आज दि.9 सप्टेंबर रोजी प्राप्त झाली आहे