Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 24, 2025
नागमठाण येथील संतोष वामन गायकवाड हा 21 ऑगस्ट रोजी चांदेगाव पुलावरून तोल जाऊन गोदावरी नदी पात्रात पडून वाहून गेला,त्याचा अग्निशामक दलाकडून गुरुवार पासून शोध घेतला जात होता दरम्यान रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास वाहून गेलेल्या संतोष याचा मृतदेह शनिदेवगाव शिवारात नदी किनारी तरंगताना आढळून आला.घटनेची माहिती मिळताच पोलिस पाटील संतोष मेघळे यांनी मयताचे नातेवाईक व वीरगाव पोलिसांना दिली.