बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय बनला आहे. या मागचं कारण असं की जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि राजकारण. बीड जिल्ह्यातील सध्याची तणावाची स्थिती लक्षात घेता जिल्ह्यात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.हा मनाई आदेश २५ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहे. समाज माध्यमातून होणाऱ्या पोस्टचे पडसाद रस्त्यावर होऊ लागले आहेत. तर बॅनरबाजीमुळेही अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. यासह मराठवाडा मुक्ती संग्राम दिन, नवरात्र उत्सवाची सुरुवात या काळात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.