गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार व निरंतर पावसामुळे साक्री तालुक्यातील दातर्ती येथे आदिवासी वस्तीत घराची भिंत कोसळली. या भिंतीखाली एक महिला अडकल्याने गंभीर जखमी झाली. सदर महिलेला 'ॲम्बुलन्स'द्वारा साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र उपचारानंतर तिला घरी सोडून देण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून साक्री तालुक्यात दमदार पाऊस होत आहे. या पावसामध्येच दातर्ती येथील वामन दगा मोरे या आदिवासी बांधवांच्या मातीच्या घर