अकोला जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांमुळे वाढत्या त्रासाला आळा घालण्यासाठी कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना पकडून शेल्टर हॉलमध्ये हलवण्याची तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाच्या वतीने करण्यात आली. या मागणीसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अद्याप कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिंदे गटाने दिला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने त्वरीत पावले उचलावीत, अशी भूमिका या गटाने मांडली असून याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष लागले आहे.