गेल्या तीन पिढ्यांपासून बालगोपाल मित्र मंडळाच्या माध्यमातून सोनझारी समाजातर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही सांस्कृतिक परंपरेनुसार आकर्षक वेशभूषेत गणपतीची स्थापना करण्यात आली. अनिकट गोट क्लब, कमला नेहरू नगर येथे भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाला रमेश मडावी, राजू पचकुरे, शंभू मडावी, दत्तू भीमारे, विशाल गावळे, तिलक रोहनकर, महेश व्यास आणि किशोर मडावी यांच्यासह बहुसंख्य आदिवासी बांधव साजरा करतात.