औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या धुवाधार पावसाने तसेच येलदरी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग येत असल्याने सिद्धेश्वर धरणाचे दिनांक 28 ऑगस्ट गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता 14 दरवाजे 0.3 मीटरने उघडून पूर्णा नदी पात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात येत आहे त्यामुळे नदीपात्राच्या पाणी पातळीत वाढ होऊन पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा सिद्धेश्वर धरण पूर्ण नियंत्रण कक्षा कडून देण्यात आला आहे